भारत पेट्रोलियमची खास ऑफर!! आता मिळणार ७५ रुपयांचे मोफत पेट्रोल अन् १००० रुपयांचा कॅशबॅक, ग्राहकांना मोठा दिलासा….

पुणे : सध्या महागाईची झळ सर्वसामान्य लोकांना बसत असताना सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमने वाहनधारकांसाठी मस्त ऑफर आणली आहे. आता भारत पेट्रोलियमवर ७५ रुपयांमध्ये मोफत पेट्रोल मिळणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना खूप फायदा होणार आहे. कंपनीची ही ऑफर २८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

यामध्ये जर तुम्हाला ७५ रुपयांमध्ये मोफत पेट्रोल मिळवायचे असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर पेट्रोल पंपावर नोंदणी करावी लागेल. तुम्हाला १००० रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळणार आहे. यासाठी तुम्हाला पेट्रोलियम पंपावरुन पेट्रोसह MAK 4T इंजिन ऑइलचा एक पॅक खरेदी करावा लागणार आहे. भारत पेट्रोलियमचा २८ फेब्रुवारीला वर्धापन दिन आहे. त्यासाठी ही ऑफर दिली आहे.
यामध्ये तुमचे वय जर १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला ऑफर मिळणार आहे, अशी माहिती आहे. इंडियन ऑइल खरेदी केल्यानंतर तुम्हाला लगेचच ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. तुम्ही भारत पेट्रोलियम पंपावर जाऊन इंजिन ऑइलदेखील बदलू शकणार आहात.

तुम्हाला एक क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा फायदा एका मोबाईल नंबरला फक्त एकदाच मिळणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना ७५ रुपयांपर्यंतचे पेट्रोल आता मोफत मिळणार आहे.
दरम्यान, सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. इंधनाचे दर काही केल्या कमी होत नाहीत. जवळपास गेल्या वर्षभरापासून पेट्रोल- डिझेलचे दर वाढतच आहेत. यामुळे ही ऑफर फायदेशीर आहे.