“श्री रामेश्वरम-तिरुपती: दक्षिण यात्रा” साठी भारत गौरव पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना


मुंबई : “श्री रामेश्वरम-तिरुपती: दक्षिण यात्रा” साठी भारत गौरव पर्यटक ट्रेन मंगळवार  दि. २३.०५.२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ११.०० वाजता रवाना झाली आणि ती वर्तुळाकार मार्गाने प्रवास करेल आणि दि. ०२.०६.२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  परत येईल.

 ऑल इंडिया रेडिओ यापुढे फक्त आकाशवाणी नावाने ओळखणार

या भारत गौरव ट्रेनच्या टूर पॅकेजमध्ये म्हैसूर, बेंगळुरू, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपती यांसारख्या दिव्य ठिकाणांना समावेश आसून १० रात्र आणि ११ दिवसांच्या प्रवास असेल. ही ट्रेन एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २ जनरेटर कोच आणि एक पँट्री कारसह चालवली जात आहे जी वातानुकूलित,  स्वच्छ आणि आवश्यक मानकांनुसार आहे.

लग्नाला तीन महिने झाले पण पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! कारण ऐकून पोलीसही हादरले..

यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री नरेश लालवानी यांनी ट्रेनमधील पर्यटकांशी संवाद साधला. मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक श्री आलोक सिंग; प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक श्री मुकुल जैन; प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री धनंजय नाईक; विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, श्री रजनीश गोयल; आयआरसीटीसी चे समूह महाव्यवस्थापक, पश्चिम क्षेत्र, श्री राहुल हिमालीयन; आणि मध्य रेल्वेचे इतर प्रधान विभाग प्रमुख देखील उपस्थित होते.

या आयआरसीटीसी (IRCTC) टुरिस्ट ट्रेन्स सर्व-समावेशक टूर पॅकेजेस आहेत आणि आयआरसीटीसी (IRCTC) ने पाहुण्यांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!