Bharat Bandh : शेतकऱ्यांकडून आज ‘भारत बंद’ची हाक! जाणून घ्या कुठे आणि काय असेल बंद..


Bharat Bandh : शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं असून आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत दिल्लीच्या दिशेन कूच करण्यास सुरुवात केली आहे. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस आहे.

संयुक्त किसान मोर्चाकडून आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला असून सकाळी ६ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा बंद असेल. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी १६ फेब्रुवारीला पुकारलेल्या ग्रामीण ‘भारत बंद’ला वैचारिक बंद म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, ही एक नवीन चाचणी आहे, याला शेती बंद असेही म्हणता येईल. शेतकऱ्यांनी आज शेतात काम करू नये.

शेतकऱ्यांनी वर्षभराआधी कृषी कायदे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी कामगार संघटनांसह शेतकरी संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. Bharat Bandh

आज भारत बंदची (ग्रामीण) हाक देण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. त्याआधी, गुरुवारी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि टोल प्लाझावर निदर्शने केली. शेतकऱ्यांनी ट्रॅकसह रस्ते अडवले. दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लुधियाना-साहनेवाल-चंदीगड मार्गावरील सहा गाड्या वळवण्यात आल्या आहेत. दिल्ली-अमृतसर मार्गावरील काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!