Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात तुफान राडा!! कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?


Bhandara : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काहीच दिवस उरले आहेत. निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी ता.११) विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मोठा दावा केला.

तसेच २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी१७५ जागा जिंकेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला आहे. अशातच भंडारा येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडे केली.

यावरून भरारी पथकाने मिठाईचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे बघायला मिळालं. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी १७५ जागा जिंकेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला होता. Bhandara

त्यानंतर भंडारा येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडे केली.

दरम्यान, यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभेतील मांडेसर या गावात काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!