Bhagyashree Navtake : IPS भाग्यश्री नवटक्के पुन्हा वादात, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Bhagyashree Navtake : भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात २०२१ मध्ये गुन्हा दाखल होता. पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून भाग्यश्री नवटके त्यावेळी कार्यरत होत्या.
Views:
[jp_post_view]