पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोशारींचा मोठा खुलासा, म्हणाले दोन नेते माझ्याकडे आले आणि…
पुणे : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठा खुलासा केला होता. असे असताना आता कोशारी देखील बोलले आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
कोशारी म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारल की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखवले. मग शपथविधी झाला.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. दरम्यान, सध्या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
मी राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचे सत्य सांगितले आहे, असेही कोशारी यांनी म्हटले आहे.