‘पुणे महानगरपालिकेत २४ × ७ पाणीपुरवठा योजनेतील लाभार्थी मीटरची तपासणी व्हावी’


पुणे : सध्या पुणे महानगरपालिकेत पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर बसवली जात आहेत. मात्र हे मीटर
ज्या पद्धतीने बसवणे आवश्यक होते, तशा पद्धतीने मीटर बसवली जात नाहीत. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

याचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घ्यावा. आयुक्तांना अहवाल सादर करावा अशी आमची मागणी आहे, असे ‘आपले पुणे’ संस्थेने म्हटले आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

सध्या महानगरपालिकेच्या २४ ×७ पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर बसवली जात आहेत. योजनेसाठी आत्तापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाला आहे. एसजीआय ही कंपनी आठ कोटी रुपये घेऊन निघून गेली आहे.

आता Watcos ही सरकारी कंपनी सल्लागार म्हणून काम करीत आहे. सुमारे २१०० कोटी रुपयांचे टेंडर L&T सारख्या नामवंत कंपनीला दिले आणि सात कोटी लीटर पाणी जर नवीन योजनेतून वाहून जात असेल तर निश्चित या मागच्या कारणांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

याबाबत क्षमता नसणारी कंपनी नेमली आहे. त्याचे हे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याबाबतीत आम्ही केलेला सर्व पत्र व्यवहार आयुक्तांना देणार आहोत.

आता काय करता येईल त्या सुधारणा आत्ताच केल्या पाहिजेत. नाहीतर नंतर मागच्या सारखे मीटर काढून टाकावी लागतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!