लाडक्या बहिणी भावांवर संतापल्या; तब्बल 80 हजार बहिणीचे अर्ज रद्द केले


पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आल्याने लाडक्या बहिणी संतापल्या आहेत. राज्य सरकारनं जवळपास 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेत. त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणार असल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणीचं पोर्टलही गेल्या सप्टेंबर पासून बंद करण्यात आलंय. त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.यावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गरज सरो वैद्य मरो ही सरकारची भूमिका आहे. लाडक्या बहीणींना दीड हजारवरून 2100 रुपये देणार अशी घोषणा करुन मतांचा डल्ला मारणार जे सरकार आहे त्या सरकारने पैसे तर वाढवलेच नाही मात्र ज्यांना काही हफ्ते मिळाले त्यातही मोठ्या संख्येवर लाडक्या बहीणींची संख्या कमी केली आणि त्यामध्ये आता नव्याने कोणाचाही समावेश करत नाही. लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला आहे..

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!