लाडक्या बहिणींचे पैसे परराज्यातील ‘लाडक्या भावांनी’ लाटले, बोगस आयडी बनवून केले एवढे अर्ज; कसं सुरु होतं रॅकेट? धक्कादायक माहिती आली समोर..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

लाडकी बहिण योजनेत आता परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे मोठं रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटच्या माध्यातून तब्बल ११७१ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे अर्ज मंजूर करून लाडक्या भावांनी पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस आणि महसूल विभागाच्या तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे. त्यामुळे नेमके रॅकेट कसं सक्रिय होतं? आणि परराज्यातील लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे कसे लाटले आहे? हे समोर आलं आहे.

लाडकी बहिण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे मोठं रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटच्या माध्यमातून लातूर आणि सांगली जिल्ह्याच्या अंगणवाडी सेविकांच्या नावाने बोगस आयडी बनवून परराज्यातील लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

वेगवेगळ्या जिल्हयातील अंगनणाडी सेविकांच्या नावाने बोगस आयडी बनवून तब्बल ११७१ अर्ज दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल केलेल्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र हे भामटे परराज्यातील आहेत.

उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यातील भामट्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये साधारण १२,१९५, ५०० इतकी रक्कम या भामट्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या लॉगिनवरून १११ अर्ज भरण्यात आले आहेत, त्यामधील २२ अर्ज हे एकट्या बार्शी तालूक्यातील आहे. या बोगस लाभार्थ्यांचा आता निधी थांबवण्यात आला आहे.

तसेच लाडकी बहीण योजनेच्या डॅमी फॉर्म रॅकेटमागे लाडक्या बहिणी असतील असं मला वाटत नाही. तर या पाठीमागे क्रिया निष्ट भाऊ आहेत. अशा क्रियानिष्ठ भावांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करू आणि रक्कम वसूल करू, असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!