अल्पवयीन मुलीसोबत केली मैत्री, तिला गार्डनमध्ये बोलावलं, न्यूड फोटो काढले अन्…., आरोपी अटकेत


संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला विविध ठिकाणी नेऊन तिचे न्यूड फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहेत. याबाबत तीन जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, ही मुलगी इयत्ता 12 वी मध्ये शिकते. सध्या ती महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहते. दरम्यान महाविद्यालयातील सिनियर असलेल्या अनिकेत राठोड, कुणाल बावत, उमेद पाशा यांच्याशी सोनालीची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी तिला गार्डनमध्ये बोलवले.

मैत्री असल्यामुळे सोनालीने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर तिघांनी सोनालीसोबत तिला लज्जा निर्माण होईल या उद्देशाने कृती केली. तसेच तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी देखील केल्या. तसेच तीचे न्यूड फोटो काढून ते समाज माध्यमावर व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक मात्र अद्याप फरार आहे.

अनिकेत राठोड रा. प्लॅटिनम सिटी, शेंद्रा, कुणाल बावत रा. छोटा मुरलीधर नगर आणि उमेद पाशा रा. क्रांती नगर, पदमपुरा असे या आरोपींचे नावे आहेत. नंतर ही गोष्ट सोनालीच्या लक्षात आली. तिने पोलीस स्टेशन गाठले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती देखील त्यांना दिली.

याप्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध पॉस्को, आयटी अ‍ॅक्टसह अन्य कलमानुसार वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ही मुलगी खूपच घाबरली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकाचा शोध पोलिस घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!