Beed : धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ, ते कुठे लपून बसलेत?, सुरेश धस यांनी केले मोठे विधान..


Beed : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

कारण देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी सापडले आहेत ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपर्कातील आहेत. तसेच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे.

या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणारे धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. मुंडे यांच्या गैरहजरेची आता सर्वपक्षीय आमदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

सत्ताधारी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत.

धनंजय मुंडेंच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे सगळे आरोप होत असताना धनंजय मुंडे हे कुठे लपून बसले आहेत ते माहीत नाही. मुंडे यांनी समाजासमोर यायला हवे. त्यांच्यावर तोंड न दाखवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजासमोर यायला हवे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरदहस्तामुळेच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच सरकारनेच धनंजय मुंडे यांना अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याचा सल्ला दिला असेल, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!