बीड हादरलं! पत्रकाराच्या मुलाची सपासप वार करत निर्घृण हत्या, नेमकं घडलं काय?


बीड : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. आता शहरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली असून, यश ढाका नावाच्या 22 वर्षीय तरुणाची भररस्त्यात चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यश हा शहरातील स्थानिक पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा मुलगा होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी हा यशचा मित्र असल्याचे समोर आले आहे. यश आणि त्याचा मित्र सुरज अप्पासाहेब काटे ( रा. बीड) यांच्यात दुपारी मित्रासोबत वाढदिवस साजरा करत असताना एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले.

हा वाद मिटवण्यासाठी यशने सुरजला माने कॉम्प्लेक्स परिसरात बोलावले. यावेळी सूरज आपल्या भावाला घेऊन आला होता. तर यश मित्रांसोबत आला होता. मात्र, दोघांमध्ये देशपांडे हॉस्पिटलसमोर पुन्हा भांडण वाढले. यश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुरजला मारहाण केली. यामुळे वाद अजून वाढला.

याच भांडणात सुरजने यशच्या पोटात आणि छातीत धारदार शस्त्राने तीन ते चार वार केले, ज्यात यशचा मृत्यू झाला. भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि एका तासातच आरोपी मित्र सुरज काटे याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!