Beed News : संपूर्ण गाव डिजेवर नाचतय आणि जावयबापूची गाढवावर मिरवणूक, आगळ्या वेगळ्या प्रथेची राज्यात चर्चा…
Beed News : जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल, मात्र बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. गावामध्ये ही परंपरा गेल्या १० दशकांपासून आहे. लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्खे गाव डीजेच्या तालावर नाचते.
सासरवाडीत जावयाचा मोठा मान असतो. लाडाचा जावई जर सासुरवाडीला आला तर त्याचा पाहुणचार करण्यात कसलीच कसर ठेवली जात नाही. मात्र बीडमधील एक याला अपवाद आहे.
बीडमधील विडा गावात जावयाची गाढवावर बसवूनन वाजत- गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेत आतापर्यंत तब्बल ९० जावयांना गाढवावरती बसून वाजत गाजत गावात मिरवले गेले आहे.त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात. Beed News
मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून काढते. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळाला. एकनाथ पवार यांचे ते लाडके जावई आहेत.
दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गाव खेड्यामध्ये ओबीसी – मराठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बीडच्या विडा गावामध्ये हा अनोखा एकतेचा संदेश आजही दिला जातोय. संपूर्ण गाव लहानांपासून वृद्धांपर्यंत एकत्र येत जावयाची अनोखी मिरवणूक काढतात. याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.