Beed News : बीड मध्ये खळबळ!! गावातील सरपंचाची हत्या, कारमधून खाली ओढून संपवलं, धक्कादायक माहिती आली समोर

Beed News : राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची घटना ताजी असतांना बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे.
संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे मसाजोग येतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांची काल हत्या करण्यात आली. Beed News
घटनेनंतर नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक झाले असून मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून रस्ता रोको केल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य रस्ता अडवून धरल्याने बीड – लातूर महामार्ग ७० किलो मीटरपर्यंत संपूर्णपणे ठप्प झाला आहे.
जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे मस्साजोग परिसरात तणाव वाढला आहे.