Beed News : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवला..
Beed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. Beed News
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक चिघळत चालले आहे. यात मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. तसेच बीड जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. Beed News
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध आज मराठा समाजाच्या भावना तीव्र झाले आहे.
सोळंके यांच्या बंगल्याची प्रचंड तोडफोड व नासधूस करून त्यांच्या घरातील दुमजली बांधकाम व वाहने पटवून दिली. तसंच, घराच्या काचा फोडण्यात आल्या आणि गाड्याही जाळण्यात आल्या. या हल्ल्यावेळी सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरातच उपस्थित होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
यावेळी त्यांच्या नर्सिंग कॉलेजच्या इमारतीची देखील प्रचंड तोडफोड करण्यात आली. यावेळी झालेला दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यानंतर बीडचं वातावरण तणावाचं झालं आहे.
आंदोलकांनी बीड-परळी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. रविवारपासून आधीच जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच गावागावांत साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी मोर्चेही काढायला सुरुवात केली आहे.