Beed : बीडच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी…


Beed बीडच्या राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांना मोबाईलवरुन शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासून नेत्यांना धमकी देण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या देखील निवडणुकीच्या काळात फुलचंद कराड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे Beed

सविस्तर माहिती अशी की, फुलचंद कराड हे या लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या कार्यालयात कार्यकारीणीची बैठक घेत होते. याच क्षणी त्यांना फोन आला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, धमकीनंतयर त्यांनी तक्रार दाखल केली मात्र तरीदेखील त्यांना वारंवार धमकीचे फोन येत होते. एवढंच नाही तर, रात्री दीड वाजता थेट त्यांच्या घरासमोर काही व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घराचे दार वाजवून ‘बाहेर ये’ असे म्हणत होते. या सर्व प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!