बीडचा झालाय बिहार!! आता संतोष देशमुखनंतर परळीत आणखी एका सरंपचाचा संशयास्पद मृत्यू, घटनेने सगळेच हादरले…

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड मध्ये मोठी गुन्हेगारी वाढली असून याबाबत गृह विभाग नेमकं करतंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने आधीच राज्यात खळबळ माजवली आहे, त्यातच परळीजवळ आणखी एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
सरपंचांच्या हत्या आणि मृत्यूच्या घटनांमुळे राजकीय व सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सीआयडी या घटनांचा सखोल तपास करत आहेत. याठिकाणी गुन्हेगारीची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. परळीतील या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आणि तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
याबाबत आता राजकीय नेतृत्व आणि पोलीस प्रशासनावर वाढत्या दबावामुळे या प्रकरणांतील सत्य लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत.
आता परळीतील सरपंचाच्या मृत्यूचा मस्साजोग प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
या घटनांनी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि राजकीय नेत्यांची विश्वासार्हता तपासणीच्या कचाट्यात आली आहे. आता परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे. या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेत त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे आता प्रशासन नेमकं काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर अजून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.