अजित पवारांमुळे आपला मतदार संघातला मार्ग झाला मोकळा! शहाजी बापू पाटील झाले खुश…


सांगोला : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आता सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची कायदेशीर बाजू भक्कम दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आणि पक्षाचे नाव हे दोन्ही अजित पवार गटालाच मिळेल, असे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.

सत्तेमध्ये अजित पवारांचा गट सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सत्तेमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये माझा मार्ग आता मोकळा झाला आहे, असेही ते सांगायला विरसले नाहीत.

राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे पाटील कल्याणराव काळे हे देखील आता माझ्या व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का असल्याचेही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार सत्तेत आल्याने अनेकांच्या मतदार संघात अडचण निर्माण झाली आहे. तिकीट कोणाला देयचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे खरी कसरत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!