दौंड तालुक्यात खळबळ! पत्नी व मुलीला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण, प्रसिद्ध डॉक्टर आणि कुटुंबावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…


दौंड : पत्नीस व मुलीस जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी दौंड मधील प्रसिद्ध दंतचिकित्सक, डॉक्टर व त्याच्या कुटुंबीयाविरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सदानंद आप्पा धुमाळ (रा. धुमाळ मेशन, गोपाळवाडी रोड ,सरस्वती नगर दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून, रमेश सखाराम धुमाळ व वत्सला अप्पा धुमाळ असे इतर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. भावना चंद्रकांत गायकवाड (लग्नाआधीचे नाव) भावना सदानंद धुमाळ( लग्नानंतरचे नाव) यांनी फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना डॉक्टरने नऊ वर्षापासून आपल्याच घरामध्ये विभक्त ठेवले आहे. फिर्यादी व मुलगी त्याच घरातील दुसऱ्या जागेत एकत्र राहतात.

समोवारी (ता.14) रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान, फिर्यादी त्यांची मुलगी व तिचा दिल्लीतील मित्र घरात असताना फिर्यादींचे पती तेथे आले व त्यांनी मुलीच्या मित्रास शिवीगाळ केली.

त्यामुळे मुलीने त्यांना विचारले की तुम्ही कोणत्या अधिकाराने माझ्या मित्रा शिवीगाळ करीत आहात. याचा डॉक्टरला राग आला व त्यांनी मुलीसही शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही डॉक्टरने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली व तुझी लायकी आहे का या घरात राहण्याची असे म्हणत घरातून निघून जाण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी यांचे दिर व सासूने सुद्धा फिर्यादी यांना मारहाण व शिवीगाळ केली.

याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!