डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने केले वार, येरवडा कारागृहात आरोपींमध्ये हाणामारी; एका आरोपीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातच हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक १ मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.

येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. कारागृहातील आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी याने विशालवर जीवघेणा हल्ला केला.

तसेच या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या घटनमेमुळं पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा ‘रोड शो’ केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारीत होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. आरोपीच्या मृत्यूने कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
