चिडलेल्या आईने बांबूने बेदम मारहाण; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू ; पिंपरी येथील घटना..!

पिंपरी : घरातील संपलेल्या साहित्य बद्दल सांगितले नाही म्हणून चिडलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलीला लाकडी बांबुने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी थेरगाव येथे (ता.१४) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी सोमवारी (ता. १५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील साहित्य संपल्याने अगोदर सांगितले नाही, या कारणावरून आरोपीने आपल्या मुलीला लाकडी बांबु आणि फळीच्या साह्याने मारहाण केली.
या मारहाणीत मुलीच्या पायाला, पाठीला आणि डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मुलीला रुग्णालायत दाखल केल्यानंतर आरोपीने मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपी महिलेने खून केल्याचे उघड झाले.