‘ तू माझी गर्लफ्रेंड हो,नाहीतर मी कोणाचा तरी खून करून…; पुण्यात 15 वर्षाच्या मुलाचं विचित्र प्रपोज


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात काही दिवसापासून खून, हाणामारी अशा गुन्हेगारीच्या वाढत्या घटना दिसून येत असतानाचं आता अल्पवयीन मुलांकडून विनयभंगाचे प्रकार घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता पंधरा वर्षांच्या मुलाने तेरा वर्षांच्या मुलीला ‘प्रपोज’ केले आहे.’तू माझी गर्लफ्रेंड हो; नाहीतर मी कोणाचा तरी खून करून तुझे नाव घेईन,’ अशी धमकी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा पीडितेच्या ओळखीचा असून त्याने तिला जवळ बोलावून गर्लफ्रेंड होण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार दिल्यानंतर मी कोणाचा तरी खुन करून तुझे नाव घेईन अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने तिला घराच्या मागे बोलावून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विविध कलमांबरोबरच पोक्सो कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2025 पासून घडत असून, 13 वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!