कलिंगड खरेदी करताना काळजी घ्या! हदरवणारा प्रकार आला समोर, जाणून घ्या..

Watermelon : कलिंगड , संत्री, द्राक्षे यांसारखी फळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक (सुमारे ९२ टक्के) असल्याने उन्हाळ्यात ते ‘सुपरफूड’ ठरते. अनेक विक्रेते कलिंगड कापून ठेवतात आणि ते लालभडक दिसत असल्याने ग्राहक आकर्षित होतात.
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, बाजारात रसाळ फळे विक्रीसाठी येत आहेत. अनेक विक्रेते कलिंगड कापून ठेवतात आणि ते लालभडक दिसत असल्याने ग्राहक आकर्षित होतात. मात्र, अशा कलिंगडामध्ये रसायनांचा वापर केलेला असू शकतो, ज्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे कलिंगड खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. सध्या बाजारात कलिंगड २० रुपये किलो दराने विकले जात आहे. उन्हाळ्यात कलिंगडाचा पुरवठा अधिक होतो, त्यामुळे त्याचे भाव वाढतात.
लालभडक दिसणाऱ्या कलिंगडामध्ये सोडियम सॅक्रिन आणि सिंथेटिक रंगाचा वापर केला जातो. अशा फळांमुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कलिंगड खरेदी करताना काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कलिंगड पिकवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. या इंजेक्शनवर सरकारने बंदी घातली आहे. अशा फळांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो. भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाते.