काळजी घ्या…हे तुमच्यासोबतही घडू शकतं! स्वस्तातली विमानसेवा पडली महागात, एक तिकीट 7 लाखांना, नेमकं घडलं काय?


मुंबई : स्वस्तात विमान तिकिटे मिळवण्याच्या प्रयत्नात माहीम परिसरातील महिलेची तब्बल 7 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर माहीम पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

माहीममध्ये राहणारी महिला सोशल मीडियावर सवलतीत मिळणाऱ्या विमानसेवेची माहिती शोधत होती. तेव्हा झोमुंक नावाच्या जाहिरातीने तिचे लक्ष वेधले. या वेबसाईटवर प्रीमियम सर्व्हिस घेतल्यास स्वस्तात विमान तिकिटे मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले होते.

त्यानंतर काही दिवसांनी एका अनोळखी क्रमांकावरून तिला व्हॉट्सॲपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. संबंधित महिलेने 12 फेब्रुवारी रोजी सर्व्हिसेस घेण्यासाठी ‘जी – पे’द्वारे 1499 रुपये भरले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिमानी हिने महिलेशी संपर्क साधला.

झोमुंक वेबसाईटची ऑपरेशन हेड असल्याचे तिने सांगितले. तसेच विमानसेवा पाहण्यासाठी मोबाईलवर पाठवलेली लिंक ओपन करण्यास सांगितले. विमानसेवा पाहण्यासाठी महिलेने आलेली लिंक उघडताच मोबाइलवर ॲप डाऊनलोड झाले.

दरम्यान, महिलेने पासबुकची एंट्री केल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली. 14 ते 21 फेब्रुवारीदरम्यान महिलेच्या विविध बँक खात्यांतून 6 लाख 95 हजार रुपये परस्पर काढण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!