काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, २४ तासात आढळले ‘एवढे’ रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?


पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात ९८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येकी 34 रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 10 रुग्ण तर पुणे ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 5 जून 2025 या कालावधीत राज्यात एकूण 14,565 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. यापैकी 1,162 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबईत सर्वाधिक 575 रुग्ण आढळले असून, हे प्रमाण चिंतेची बाब आहे. सध्या राज्यात 548 सक्रिय करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय, आतापर्यंत 597 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 16 जण हे सहव्याधीग्रस्त होते.

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार आणि क्षयरोग अशा गंभीर आजारांचे प्रमाण अधिक होते. तर श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांचे राज्यभरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे आणि त्यांची करोना चाचणी केली जात आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मुंबई आणि पुणे (प्रत्येकी 34), पिंपरी-चिंचवड (10), पुणे ग्रामीण आणि ठाणे (प्रत्येकी 4), सांगली व छत्रपती संभाजीनगर (प्रत्येकी 3), कल्याण (2), तसेच वसई-विरार, सातारा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!