काळजी घ्या, बर्ड फ्लूने वाढवली चिंता! केंद्र सरकारचा ९ राज्यांना हायअलर्ट…

नवी दिल्ली : भारतात बर्ड फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच याच पार्शभूमीवर केंद्र सरकारने पंजाबसह ९ राज्यांना अलर्ट जारी केला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग संक्रमित चिकन आणि दूषित वातावरणातून होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने पंजाबसह ९ राज्यांना अलर्ट जारी केला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग संक्रमित चिकन आणि दूषित वातावरणातून होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व पोल्ट्री फार्म आणि चिकन विक्री केंद्रांचे नियमित निरीक्षण करणे.
जलद प्रतिसाद पथके सक्रिय करणे आणि पशुवैद्यकीय सुविधा वाढवणे.
असामान्य मृत्यूच्या घटना वेळेत नोंदवून योग्य उपाययोजना करणे.
बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत?
बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असतात, परंतु काही गंभीर परिणाम दिसू शकतात:
ताप आणि खोकला
डोळे लाल होणे आणि गळा खवखवणे
थकवा, स्नायूंमध्ये वेदना आणि मळमळ
श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका
बर्ड फ्लू संसर्ग कसा होतो?
संक्रमित पक्ष्यांच्या थेट संपर्कातून
दूषित जागा किंवा पाणी यांच्याशी संपर्क आल्याने.
पूर्ण शिजवलेले नसलेले चिकन किंवा अंडी खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
बर्ड फ्लूपासून बचावासाठी उपाय पुढील प्रमाणे..
पक्ष्यांना हात लावल्यानंतर हात साबणाने धुवा.
अर्धकच्चे चिकन किंवा अंडी टाळा, ते नीट शिजवून खा.
शक्यतो जंगली आणि घरगुती पक्ष्यांपासून लांब राहा.
बर्ड फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वैद्यकीय सल्ला घ्या.
फ्लू प्रतिबंधक लस घेणे फायदेशीर ठरू शकते.