बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयावर आयकरचा छापा, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे सर्वांचे मोबाईल जप्त…!

नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आज आयकर विभागाचे छापे टाकण्यात येत आहेत. आयटी विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयातील कागदपत्रे आणि संगणक डेटा तपासत आहेत.
आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सूड भावनेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता.
Views:
[jp_post_view]