मित्राच्या मृत्यूनंतर बॅचने जपली मैत्री, नितीन शिंदे यांच्या मुलीच्या नावावर ११ लाखाचे करणार फिक्स डिपॉझिट…!
पुणे : पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन दिलीप शिंदे यांचा ३१ जानेवारीला सोलापूरहून पुण्याला येत असताना बसचा अपघात झाला. यामध्ये त्यांचे निधन झाले. असे असताना २००७ च्या पोलीस बॅचमधील प्रत्येकाने १ हजार रुपयांपासून १० हजारांपर्यंत असे मदत म्हणून गोळा केले आहेत.
हे पैसे जवळपास ११ लाखाच्या दरम्यान गेले. आता ही रक्कम दिवगंत नितीन यांच्या मुलींच्या नावे बँकेत फिक्स डिपॉजिट (एफडी) केली जाणार आहे. २००७ पोलिस बॅचमधील त्यांच्या मित्राने नितीनच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निश्चय केला आहे.
आता बँकेत फिक्स डिपॉजिट केल्यानंतर दर महिन्याला व्याज मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही मुलींचा शैक्षणिक खर्च भागण्यास मदत होणार आहे. यामुळे मित्रांनी त्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली आहे.यासाठी पोस्ट कार्यालय किंवा सरकारी बँकेत ही रक्कम जमा केली जाणार आहे. अनेक मित्रांनी यासाठी आपापल्या परीने मदत केली आहे.