सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार व पेन्शन सुद्धा वाढणार?, जाणून घ्या..
मुंबई : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ही बातमी केंद्रीय शासकीय सेवेत म्हणजेच केंद्रीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचे राहील.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने महागाई भत्ता वाढ जाहीर केली. जुलै २०२४ पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३% एवढा झाला आहे. जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी ही वाढ लागू राहणार आहे.
दरम्यान,आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ५० टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. अर्थातच यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. महागाई भत्ता ५३% झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात यामुळे वाढ झाली आहे.
मात्र यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. खरे तर जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% झाला तेव्हाच या चर्चांना जोर मिळाला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% क्रॉस झाल्यानंतर हा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात जोडला जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३% झाला असल्याने हा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात जोडला जाणार अशा चर्चा होत आहेत. मात्र खरंच सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार आहे का? तर नाही.
शासन दरबारी अशा कोणत्याच प्रस्तावावर चर्चा सुरू नसल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात जोडला जाणार नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, ५ व्या वेतन आयोगादरम्यान, ५०% पेक्षा जास्त असल्यास महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा मुद्दा कधीच समाविष्ट करण्यात आला नाही.
दरम्यान, यावेळी देखील सरकार महागाई भत्ता ५०% क्रॉस झाला असला तरी देखील तो भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडणार नाही. याबाबत सातव्या वेतन आयोगात कोणतीच तरतूद नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे.
यामुळे सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांप्रमाणे काहीच घडणार नाहीये. अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारा ५३% महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात जोडला जाणार नसून महागाई भत्ता पुढेही असाच वाढत राहणार आहे.