धान, भरडधान्याच्या आधारभूत किमती जाहीर, जाणून घ्या..


मुंबई :  केंद्र शासनाने पणन हंगाम २०२३ २४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान / भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किमती (हमीभाव जाहीर केल्या आहेत.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत धान किंवा भरडधान्य बाज रपेठेत विकावे लागू नये म्हणून राज्य सरकार या धान्यांची खरेदी करणार आहे. यासाठी राज्यात खरेदी केंद्रेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०२३ २४ साठी या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत.

या योजनेंतर्गत धान / भात सर्वसाधारण (एफ.ए.क्यू) २,१८३ रुपये, अ दर्जा २, २०३ रुपये, ज्वारी (संकरित) ३,१८०, ज्वारी (मालदांडी) ३,२२५, बाजरी २,५००, मका २,०९०, रागी ३,८४६ रुपये याप्रमाणे आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगामात ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत धान खरेदीचा कालावधी असणार आहे; तर भरडधान्य १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदीचा कालावधी असणार आहे.

आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत.

त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्रे सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी धानाची व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला. ही माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!