मद्यप्रेमींचे होणार हाल! राज्यातील बार आणि रेस्टॉरंट उद्या राहणार बंद, नेमकं कारण काय?


मुंबई : मद्यप्रेमींचे उद्या हाल होणार असून कारण महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट उद्या बंद राहणार आहे. पेगच्या पेग रिचविण्यासाठी आणि त्यासाठी सेवा देणाऱ्या बार-रेस्टॉरंटमध्ये उद्या बसता येणार नाही. उद्या महाराष्ट्रातील सर्व बार आणि रेस्टॉरंट बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

महाराष्ट्रातील सुमारे २०,००० बार मालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ८,००० बारचा समावेश आहे. राज्य सरकारने उत्पादन शुल्कात थेट 60% वाढ केली आहे.

दरम्यान, याचा बार चालकांकडून विरोध केला जात आहे. यापूर्वी सरकारच्या माध्यमातून १० टक्के व्हॅट देखील लावण्यात आला होता. आता परवाना शुल्कात देखील थेट 15% ची वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या विरोधात उद्या बार चालकांनी संप पुकारला आहे.

असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स या संघटनेने संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. सरकारने परवाना शुल्क,मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्क यामध्ये वाढ केली होती, ही वाढ मागे घेतली नाही तर संपावर जाऊ असा इशारा बार मालकांनी दिला आहे.

दरम्यान, AHAR चे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी म्हटलंय की कोविडनंतर करण्यात आलेल्या दरवाढीनंतर व्यवसाय करणं कठीण होत चाललं आहे खासकरून या दरवाढीनंतर ते अधिकच मुश्कील झाल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!