बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला..; संजय राऊतांच्या अजित पवारांना इशारा
इंदापूर : बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचाराने बसलेले आहात, मला अन्नद आहे की, इंदापूरला सुप्रिया ताईंच्या प्रचारासाठी मला येता आले.
एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत आहे की, पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्वीकारणार नाहीत. त्याचे भय वाटायला लागले की, मोदींचा मार्ग सुरु होतो, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. संजय राऊत म्हणाले.
धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला माहित आहे आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे.
ही मर्दांची सभा, नामर्द होते ते पळून गेले, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. आताही प्रचाराची गरज नाही. बारामतीचे गुजरात करू पाहत असाल तर इथे शिवसेनेचा झेंडा असेल. धमक्या देऊन मत मागतात त्यांनी विकास केला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.