Baramati : बारामतीच्या युवकाने केला विक्रम!! दुचाकीवर 20 दिवसात 6 हजार किलोमीटरचा प्रवास, 18000 उंचीवर केला प्रवास…


Baramati : बारामती तालुक्यातील कोडोली या गावातील एका युवकाने मोठ्या हिमतीने मोठा प्रवास केला आहे. हा युवक लडाखला जाण्याची त्याची इच्छा होती. ती देखील दुचाकीवरूनच जायचे असा संकल्प करून त्याने त्याची तयारी केली होती. आणि ती इच्छा त्याने प्रत्यक्षात देखील आणली.

त्याने 20 दिवसात 6250 किलोमीटरचं अंतर पार करत बारामतीचा सुनील संभाजी देवडे हा युवक दुचाकीवरून थेट लडाखची यात्रा करून आला. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. जुलै महिन्यात त्याने प्रवासाला सुरुवात केली. त्याची गाडी देखील जास्त मोठी नव्हती.

पॅशन प्रो या मॉडेलची गाडी त्यांनी त्यासाठी निवडली होती. महाराष्ट्रातील शिर्डी, मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर, उज्जेनचा महाकाल, राज्यस्थान मधील कोरा, जयपुर, अमेर फोर्ड, निहारगड फोर्ड त्यानंतर हरीयानातील हासी, रतीओ या ठिकाणावरून प्रवास करून पंजाब मधील भारत पाकीस्तानची वाघा बॉर्डर, गोडन टेम्पल अमृतसर, (श्रीनगर), जम्मू सोनमार्ग, बालटाल या मार्गाने स्वनील अमरनाथला गेला.

तेथून कारगिल मार्गे नामालिखा पर्यंत बारा हजार एकशे आठ फुट उंचीवर तो पोहोचला. त्यानंतर खारदुंगला पास या सर्वात अवघड चढणीचा पास त्याने पूर्ण केला. यामुळे त्याचे कौतुक होत असून अनेक अडचणी पार करून त्याने हे काम केले आहे. Baramati

दरम्यान, तब्बल 18 हजार फूट उंचीवर ते ठिकाण आहे. तेथून च्यागला पास या मार्गाने तो मनालीला पोहोचला. त्यातून चंदीगडमधून दिल्ली आणि दिल्लीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्राला भेट दिली. श्रीकृष्ण जन्मभूमी व राजस्थान, जयपुर, अजमेर, उदयपुर करत गुजरात मधून मुंबई व पुण्याहून 20 दिवसांनी तो घरी आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!