Baramati : बारामतीत शिक्षकाने प्रेमात तोडल्या वयाच्या सगळ्याच सीमा! चक्क साठ वर्षाच्या शिक्षकाने वीस वर्षाच्या मुलीशी केला प्रेमविवाह…
Baramati : बारामतीत एका लग्नाची जोरदार सध्या चर्चा सुरु झाली आहे. इथे एका शिक्षकाने प्रेमात वयाच्या सगळ्या मर्यदा तोडल्या आहेत. ही घटना आहे बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.
या गावात शाळेत शिकवणारा शिक्षक नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे. अशावेळी ज्या शाळेत आपण शिकवतो, त्या शाळेतील वीस वर्षीय मुलगी प्रेमात पडली आणि रितसर दोघांनी प्रेमविवाह केला आहे. Baramati
प्रेमविवाह करण्यात गैर ते काय? कुणालाही हा प्रश्न पडेल, खरंतर प्रेमाला वय नसतं, पण समाजात म्हंटले जाते की, वयाचेही काही बंधन असतं, वयाचं काही अंतरही असतं येथे मात्र या अंतराची ऐशीतैशी झालेली या प्रेमविवाहात पाहायला मिळाली.
अर्थात आता कायद्याने सज्ञान झालेली मुलगीच जर आपण प्रेमविवाह पूर्णपणे शुद्धीवर असताना, विचारपूर्वक केलेला आहे असे सांगत असेल, तर कायदा देखील त्याला काही करू शकत नाही. साहजिकच सध्या हा प्रेमविवाह चर्चेचा विषय ठरला आहे.