Baramati : ब्रेकिंग! युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ


Baramati : राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली आहे.

सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी मोठं सर्च ॲापरेशन केल.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये काय सापडलं, नेमकं कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आलाी, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Baramati

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. राज्यासह देशाचे लक्ष बारामतीमधील निवडणुकीकडे लागले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आपण कुटुंबात एकटे पडलो असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय वगळता पवार कुटुंबातील इतर सगळेजण शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. श्रीनिवास पवार यांनीदेखील अजित पवारांना विरोध दर्शवला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!