Baramati : बारामतीच्या उद्योजकाने कस्टम अधिकाऱ्याची जिरवली, थेट मुंबई गाठून केली तक्रार, अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक…


Baramati : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका उद्योजकाने मशीनचे पार्ट चीन मधून मागवले होते. अँटी-डम्पिंग ड्युटी माफ करण्यासाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये लाच मागितली. यामुळे या उद्योजकाने थेट सीबीआयकडे तक्रार केली, यामुळे हा अधिकारी जाळ्यात सापडला आहे.

यामुळे 80 हजार रुपयांची लाच घेताना कस्टमचा अधिकारी साकेत कुमार याला अटक करण्यात आली. यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील युवा उद्योजक अक्षय निंबाळकर यांचा बारामतीतील एमआयडीसीमध्ये लेझर कटिंग चा कारखाना आहे. त्याने चीनमधून काही मशिनरी मागवून घेतली.

नंतर ही मशिनरी मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलच्या कुरिअर सेलमध्ये आली. असे असताना येथील सेलमध्ये तैनात असलेला कस्टमचा अधिकारी साकेत कुमार याने यावर 2 लाख 80 हजार रुपयांची अँटी डम्पिंग ड्युटी असल्याचे सांगितले.

तसेच ही ड्युटी माफ करायचे असेल तर त्याच्या निम्मे म्हणजे दीड लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. यानंतर ही लाच 80 हजार रुपयावर ठरली. यानंतर उद्योजक महेश काटकर व अक्षय निंबाळकर यांनी सीबीआय कार्यालय गाठले. त्यांनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. Baramati

अशा अधिकाऱ्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतो, हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगत तक्रार दाखल केली. सीबीआयने या संदर्भातील पडताळणी केली आणि 80 हजार रुपयांची लाच घेताना कस्टम अधिकारी साकेत कुमार याला अटक केली. यामुळे अनेक तरुणांना अडचणी येतात.

यामुळे सीबीआय आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साकेत कुमारच्या घराची देखील झडती घेतली. नवी मुंबईतील उळवे या ठिकाणच्या साकेत कुमारच्या घराची देखील झडती घेण्यात आली. त्यांला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!