Baramati News : धक्कादायक! मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, सख्खा मावस भावाचं कृत्य, बारामतीमधील संतापजनक घटना…


Baramati News : पुणे जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थीनी बारामती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते.याबाबत त्या मुलीच्या मैत्रिणींनी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. Baramati News

त्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरूवातीला करण्यात आला. परंतू त्याने मोबाईल स्वीच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. पण आरोपी सकाळी सात पासून मुलीला ब्लॅकमेल करून भेटायला बोलवत होता.

दरम्यान, त्यानंतर घाबरलेल्या मुलीसोबतच्या मैत्रिणीनी, व सामाजिक कार्यकर्त्यांने प्लॅन केला. त्या आरोपीला मुलगी घाबरली आहे, ती भेटायला तयार असल्याचे भासवले. त्यावर आरोपीने तिला शाहू हायस्कुल समोर भेटायला बोलावले. तसेच परत पुढे पाटस रस्ता येथे आरोपीने येण्यास सांगितले. यावेळी शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मदत मागण्यात आली.

त्यानंतर अवघ्या दहा मिनिटाच्या आत गुन्हे शोध पथकाचे अक्षय सीताप ,दशरथ इंगुले हे कर्मचारी हजर झाले. सर्वांनी मिळून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपी हा मुलीचा सख्खा मावस भाऊ निघाला.

दरम्यान, मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत तिने तक्रार करू नये म्हणून दबाव आणण्यात आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!