Baramati News : कोयता गँगचे लोन आता बारामतीत!! सकाळी सकाळी कोयता घेऊन दहशत….


Baramati News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या अशीच एक घटना समोर बारामतीतून समोर आली आहे.

बारामती शहरातील साठवण तलावाच्या बाजूने निर्भया पथक पेट्रोलिंग करत असताना निरा डाव्या कालव्याच्या बाजूने हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एकास ताब्यात घेतले. Baramati News

अनिल सुरेश माने (वय. २३ वर्ष राहणार खंडोबानगर, बारामती, ता. बारामती) असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बारामती साठवण तलाव आणि निरा डावा कालव्याच्या परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, बारामती शहरातील निर्भया पथकातील महिला फौजदार श्रीमती देशमुख महिला पोलीस ज्योती जाधव यांच्यासह दोन होमगार्ड परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान निराळा कालव्याच्या परिसरात साठवण तलावानजीक एकजण हातामध्ये कोयता घेऊन कोयता नाचवत लोकांमध्ये दहशत पसरवत होता.

त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने अनिल सुरेश माने असे सांगितले, त्यास त्याच्या हातात असलेल्या धारधार लोखंडी कोयत्याबाबत विचारले असता, करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!