Baramati News : भाजपचे ‘मिशन २०२४’, बारामतीत भाजपचाच खासदार असणार… बैठकीत नेमके काय ठरलं?

Baramati News बारामती : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. तसेच लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
भाजप विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकत्र आली आहे. परंतु भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपकडून ‘मिशन २०२४’ सुरु झाले आहे. आता अजित पवार यांच्या बारामतीमध्ये लोकसभेची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्रही सुरु आहे. Baramati News
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर मध्ये भाजपच्या १०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी, अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते घरोघरी पोहोचणार आहे.
त्याचबरोबर घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची देखील माहिती देणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा लवकरच होणार आहे. असा विश्वास भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.
बारामती मतदार संघातून पुढचा खासदार भाजपचा असणार आहे, असे अंकिता पाटील यांनी सांगितले. मिशन बारामतीसाठी भाजप सज्ज आहे. यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला जात आहे.
बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहेत. मात्र भाजप महायुतीचे उमेदवार कोण असणार आहेत? हे अद्याप निश्चित झालं नाही. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीतून भाजपकडून नेमकं कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.