बारामतीत बेवारस आढळून आलेल्या दांपत्याचा खूनच ! अर्थिक कारणावरुन खून झाल्याचे उघड ..!!


बारामती : बारामती शहरात सचिन महालिंग वाघोलीकर व सारिका सचिन वाघोलीकर या पती-पत्नीचा मृतदेह आढळून आलेला मृतदेह हा घातपात असून आर्थिक कारणावरून या पती-पत्नीचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी या खून प्रकरणी दिग्विजय गणेश झणझणे यास ताब्यात घेतल्या असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बारामती शहरात सचिन वाघोलीकर व सारीका वाघोलीकर या दांपत्याचा मृतदेह आढळून आला होता.या घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी व पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाला सुरुवात केली होती. पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तपासासाठी पोलीस पथक तैनात केली.

सदर गुन्ह्याचा तपासात आर्थिक कारणावरून झाला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून हा निर्घृण खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी दिग्विजय गणेश झणझणे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!