Baramati Lok Sabha : निवडणूक आयोगाची कमाल! बारामतीत अजून एका उमेदवारास तुतारी चिन्ह, सुप्रिया सुळे यांची तक्रार….
Baramati Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता, यानंतर आता कुणाचा सामना कुणाविरुद्ध होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हही दिलं आहे.
यातल्या एका निवडणूक चिन्हावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे. बारामती मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोहेल शेख या उमेदवाराला ट्रंपेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाला सुप्रिया सुळे यांनी हरकत घेतली आहे. Baramati Lok Sabha
बारामती लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असताना दोन उमेदवारांना तुतारी हे चिन्ह दिल्याने सुप्रिया सुळे यांनी मतदारांचा गोंधळ होऊ शकतो अशा मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली असून या पक्षाचे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे आहे. आता अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिले गेल्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो असं सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे.
हा गोंधळ टाळण्यासाठी ट्रंपेट या चिन्हाच्या खाली त्याचा मराठी अनुवाद तुतारी असा लिहिला आहे यातील चिन्हासाठी आक्षेप नाही मात्र मराठी तुतारी हा शब्द बदलून त्या ऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे.