Baramati : बैलांचा नाद थेट गोळीबारावर पोहोचला! बारामतीत काकडेंकडून गोळीबार, भयंकर माहिती आली समोर….

Baramati : निंबुत (ता. बारामती) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या उत्कर्ष बंगल्यावर गुरुवारी (ता.२७) रात्री उशिरा गोळीबार झाला. हा गोळीबार बैलाच्या व्यवहारातून झाल्याची माहिती आहे.
यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. रणजीत निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना गोळीबार झाला, ज्यात निंबाळकर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी शहाजी काकडे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव गौरव काकडे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. काकडे यांनी खरेदी केलेल्या सुंदर या बैलाच्या व्यवहारातून हा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे.
गुरुवारी रात्री साडेबारा वाजता रणजित निंबाळकर हे निंबुत येथील शहाजीराव काकडे यांच्या बंगल्यावर आपल्या साथीदारांसह गेले होते. शर्यतीच्या बैलाच्या घेवाण-देवाण यावरून हा वाद झाल्याचे समजत आहे. यामध्ये गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.