Baramati : संपूर्ण पवार कुटूंब पालखीच्या दर्शनाला बारामतीत, आज रोहित पवार, सुप्रिया सुळे तर उद्या शरद पवार, अजित पवार राहणार उपस्थित…
Baramati : संत तुकोबारायांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यात दाखल झाला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे बारामती शहराच्या अलीकडे पालखीचे दर्शन घेणार आहेत.
नंतर शहरात पालखी पोहोचल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पालखीचे दर्शन घेणार आहेत. शनिवारी सकाळी आमदार रोहित पवार हे बारामती ते बऱ्हाणपूर दरम्यान पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर ते ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यातील निराशाही स्नानाकडे पोहोचून तेथेही पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात वारकऱ्यांना स्वीटर व इतर साहित्याचे वाटप करणार आहेत. आणि त्यानंतर शारदा प्रांगणातील पालखी मुक्काम स्थळी भेट देऊन दर्शन घेणार आहेत. यामध्ये त्या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. Baramati
पालखी सणसरकडे प्रस्थान करताना पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पालखी सोहळ्याचे स्वागत करून बारामती ते काटेवाडी चालणार आहेत. Baramati
दरम्यान, कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज व त्यांचे सहकारी शरद पवारांना भेटले होते. त्यानंतर पवार यांनी यावर्षी आपण वारीच्या स्वागतासाठी सहभागी होणार असल्याचे सांगितले.
यावर अनेकांनी टीका देखील केली आहे. शरद पवार हे वारीत चालणार असल्याची माहिती अनेकांनी दिली. मात्र त्यावरून शरद पवारांनी आपण पालखीचे स्वागत करणार आहोत, मात्र चालणार नाही असे स्पष्ट केले.
गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सौ सुनेत्रा पवार यांनी बारामती शहरात पालखी सोहळा आगमन करत असताना पालखी सोहळ्याचे स्वागत केले होते. अजितदादांनी तर रथाचे सारथ्य करत पालखी मुक्कामी असलेल्या शारदा प्रांगणापर्यंत रथामध्येच बसून पालखीचे सारथ्य केले होते.