Baramati : बारामतीकरांना धडकीच भरली! अचानक बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या टाकीजवळ पडली वीज, नेमकं काय घडलं?


Baramati : राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले आहे. तसेच काल गुरुवार झालेल्या अवकाळी पाऊसाने बारामतीकरांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागले. या पूर्व मोसमी पावसाच्या या हंगामामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट झाला आहे.

तसेच काही ठिकाणी विजा कोसळल्या देखील मात्र नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु बारामतीकरांच्या काळजाचा ठोका मात्र रात्री चुकवला. बारामतीच्या बाजार समितीच्या शेजारी असलेल्या इंदापूर बारामती रस्त्यावरील पेट्रोल पंपावर अघटीत घटना घडली.

या पेट्रोल पंपाच्या अंडरग्राउंड असलेल्या डिझेलच्या टॅंकवरच थेट वीज कोसळली. फार मोठा अनर्थ घडला असता, मात्र हे टॅंकवरच्या झाकणावर सारे निभावले. टॅंक वर असलेल्या मजबूत झाकणावर वीज कोसळताच झाकण दणकण उडाले आणि विजेचा तेवढा गंभीर परिणाम आतल्या टँकवर झाला नाही, मात्र तरी देखील या पंपातून डिझेल उसळले, ते थेट पंपाच्या डिझेल पेट्रोल सोडतो, तिथपर्यंत पोहोचले.

या घडलेल्या घटनेने पंपावरील तर सारे हबकून गेले होतेच, पण त्याहीपेक्षा होत्याचे नव्हते होणारी घटना घडली असती. या भीतीने साऱ्यांच्याच अंगावर शहरा आला. विशेष म्हणजे पावसाच्या काळात आश्रय घेणारेही वाहन चालक या ठिकाणी होते. राज्यभरात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. Baramati

बारामतीमध्ये संध्याकाळच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. बारामती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड आवारात इंदापूर रस्त्यावर पेट्रोल पंप आहे. येथे जोरदार झालेल्या पावसामुळे वीज कोसळली. ही वीज पंपाच्या अंडरग्राऊंड असलेल्या पेट्रोल टँकवर कोसळल्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यामधे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार फार मोठा अनर्थ होण्यापासून अगदी थोडक्यात बचावले. जेव्हा वीज कोसळली, तेव्हा पेट्रोल पंपाच्या अंडरग्राउंड टॅंक वरील लोखंडी झाकण दणकण उडाले आणि आतील डिझेल देखील उसळले आणि ते पंपापर्यंत पोहोचले.

दरम्यान, काहीही घडू शकते याची भीती असल्याने बारामती नगरपरिषदेकडून अग्निशमन विभागाची गाडी पाठवण्यात आली होती. मात्र सुदैवाने पुढे काही घडले नाही. आज पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी येऊन या ठिकाणची पाहणी करणार आहेत. मात्र काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!