Baramati Election : बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार? बहिणीला पाडण्यासाठी अजितदादांची जोरदार फिल्डींग…
Baramati Election : राज्यात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे केल्या अनेक दशकापासून रुजलेलं समीकरण आहे.
पण आता खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पवार कुटुंबातीलच उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यासाठी उमेदवार असू शकतात त्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अशी सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
ज्या बहिणीला निवडून आणण्यासाठी याआधी अजित पवारांनी मते मागितली, त्याच बहिणीला पाडण्यासाठी अजित पवारांनी आता कंबर कसली आहे. दोन दिवसापूर्वी बारामतीत अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेला त्यांना आणि विधानसभेला मला मतदान करणार असाल तर दोन्ही वेळेस मतदान त्यांनाच करा असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे रणशिंग फुंकले.
या अजित पवारांच्या वक्तव्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली उमेदवार कोण असणार याची. अजित पवार लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची जास्त शक्यता आहे. Baramati Election
तशी चर्चा देखील रंगू लागली आहे आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात सुतोवाच केला आणि अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो असे देखील सांगितले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिलांची संवाद साधत आहेत. तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात खासदार सुनेत्रा पवार यांचा वावर वाढला आहे.
सोबतच जय पवार देखील मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ननंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळू शकतो.