बारामतीचे निवडणूक बिनविरोध नाहीच? आता सुनेत्रा पवारांविरोधात अभिजित बिचकुले रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल..

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक लागली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना आता मात्र निवडणूक बिनविरोध होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार पुढाकार घेत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रमुख पक्षाच्या नेत्यांसोबत बोलणी ही सुरू केली आहे. एकीकडे बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. विशेष म्हणजे आज अभिजित बिचकुले याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यामुळे आता निवडणूक अटळ आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचूकलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत बारा उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे मतदान होईल असेही सांगितले जात आहे.

बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूका लढवल्या आहेत. ते निवडणूक लढण्याची एक ही संधी सोडत नाहीत. यामुळे आताही ते माघार घेणार नसल्याचे सांगितले जात आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत ही त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. अनेक ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आहे.
दरम्यान, इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तरी बिचुकले हे मैदान सोडणार नाहीत अशी चर्चा आहे. याआधी ही त्यांनी उदयनराजे भोसले, आदित्य ठाकरे, यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.