Baramati Crime : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू, बारामतीतील डॉक्टरांवर गुन्हा दाखल..

Baramati Crime बारामती : बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या प्रसूतीवेळी दवाखान्यात डॉक्टर उपस्थित नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बारामतीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Baramati Crime

डॉ तुषार गोविंद गदादे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे.
मिळलेल्या माहिती नुसार,२२ डिसेंबर २०२२ रोजी पद्मिनी गोपाळ गायकवाड यांना नववा महिना चालू असल्याने गदादे डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रसूतीसाठी गायकवाड यांना हॉस्पीटलमध्ये प्रसुतीसाठी ऍडमिट करून घेतले.

गायकवाड यांना ऍडमिट करून डॉक्टर बाहेर निघून गेले. त्यांचे गैरहजेरीत त्यांनी आर्हताधारक डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध ठेवले नाहीत. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर (Baramati Crime) पोलीस स्टेशनमध्ये भादवि का क ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉक्टरांचा हलगर्जीपणा..
आतापर्यंत आपण प्रसुतीदरम्यान बाळ दगावल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांवर वेगवेगळे आरोपही होताना आपण पाहिले आहे. त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा कायम समोर आला आहे.
तरीही डॉक्टर अनेकदा आरोप फेटाळून लावतात. मात्र यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे बाळ दगावल्याचे स्पष्ट आहे. आपल्या अनुपस्थितीत पर्यायी सोय उपलब्ध न करुन देता रुग्णालयात अनुपस्थित राहिल्याने बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांनी थेट डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.