Baramati : भयंकर! बारामतीत जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, ‘त्या’ अवस्थेत फोटो काढले अन्….
Baramati : युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१०) रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.
बारामतीमध्ये शिकण्यासाठी आलेले हे विद्यार्थी मित्र फिरायला गेले असता असा प्रकार घडला, युवतीच्या अंगावरील दागिनेही काढून नेल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, बारामतीत शुक्रवारी युवक आणि युवती गाडीमध्ये गप्पा मारत असताना त्यांना दोन अज्ञात आरोपींनी लुटले या युवकांना लटल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी दोघांकडी पैसा व ऐवज लुटल्यानंतर दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावले. Baramati
त्यानंतर, नको त्या अवस्थेत दोघांचे फोटो काढून घेतले आणि हे फोटो व्हायरल काढण्याची धमकी दिली. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, अद्यापही अज्ञात आरोपी कोण आहेत, याचा शोध लागला नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.