बारामती मतदारसंघ चर्चेत! आज दिवसभर अजित पवार, सुप्रिया सुळे रोहित पवार तळ ठोकून..!!


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे व रोहित पवार हे एकाच दिवशी बारामती दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाने काल पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. त्यानंतर ते आज दिवसभर बारामती दौऱ्यावर आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेपासून बारामतीतील विविध विकास कामाची पाहणी केली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेतला.

त्यांनतर अजित पवार यांचा वृंदावन लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे व त्यानंतर सांयकाळी पाच वाजता पणदरे शेतकरी मेळाव्याच्या आयोजनही करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी साडे आठ वाजता शरद पवार गटाचे पक्ष कार्यालयाचे उदघाटन केले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची बारामती मध्ये विविध ठिकाणी गाठीभेट घेणार आहे.

दुसरीकडे आमदार रोहित पवार हे काटेवाडी येथे भेट देणार असून, शारदानगर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तर कृषी विज्ञान केंद्र शेतकरी संवादासाठी उपस्थित राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!