Baramati : बारामतीत ढगफुटी!! झाला रेकॉर्डब्रेक पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ…
Baramati : राज्यभरात गेल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसेच सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत व त्यानंतर मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने बारामती शहरात तब्बल १४६ किलोमीटर पाऊस पडला. या पावसाळ्यात २४ तासाच्या आत झालेला हा सर्वाधिक पाऊस होता फक्त बारामतीच नाही तर तालुक्यातील सावंतवाडी येथे देखील १०९ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
सोमवारी रात्री परतीचा पाऊस संपल्यानंतर हिवाळी मान्सून मधील हा सर्वात मोठा पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस झालेल्या परिसरामध्ये उंडवडी कडे पठार 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमेश्वर कारखान्याचा परिसरात ६९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शारदानगर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात ६३ मिलिमीटर, सावंतवाडी गावात १०९ मिलीमीटर, गाडीखेल परिसरात ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुणवडी गावात ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. Baramati
दरम्यान, यावर्षी बारामती शहरात एक जून २०२४ पासून झालेल्या एकूण पावसाची नोंद ११९७ मिलिमीटर झाली हा बारामती तालुक्यातील सर्वाधिक पाऊस असून त्या पाठोपाठ सोमेश्वर कारखाना परिसरात ११३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली बारामती तालुका हा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे, मात्र यावर्षी या तालुक्यातही तुलनेने पाऊस चांगला झाला.